या ब्लॉगवर राजकीय, सामाजिक लेखन असेल. हि माझी वैयक्तित मतं असली तरी ती समाज विघातक नाहीत. त्यामुळेच आपणास हे लेखन योग्य वाटल्यास समाजमाध्यमांवर शेअर करण्यास माझी मुळीच हरकत नाही. त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्याची गरज नाही. माशाचा काटा गळ्यात अडकावा तसे माझे लेखन एखाद्याच्या गळ्यात अडकल्यास त्यास मी जबाबदार नाही.
Wednesday, 30 April 2014
Tuesday, 29 April 2014
Love Poem : येते ओठावर गाणे
ती आयुष्यात येते तेव्हा त्याला किती बोलू आणि किती नको असं होतं. त्याचं आयुष्य एखाद्या खळाळत्या ओढ्यासारखं वाहत. पण ती आयुष्यातून दूर जाते तेव्हा …………
तेव्हा त्याचं सारं आयुष्यच अचेतन होतं. ओठांमधले शब्द ओठातच मिटून जातात. ती आयुष्यातून दूर जाते तेव्हा साऱ्या स्वप्नांचीच राख होते. पण तरीही तिच्या प्रेमावर त्याची एक अढळ निष्ठा असते. तिच्याविषयी एक आत्मविश्वास असतो. आणि म्हणूनच मनात एक आशावाद असतो कि विरहाचं हे मळभ दूर होईल. ती पुन्हा आवेगानं धावून येईल आणि त्याला तिच्या प्रेमाच्या कुशीत घेईल. या आशावादाच्या आधारावरच तो आयुष्य जगत रहातो. दुख पापण्यांच्या आड लोटून देतो. दुखाचे सारे कडू घोट पीत राहतो.
Monday, 28 April 2014
Sunday, 27 April 2014
Indian Politics and Arvinda Kejriwal : अरविंद केजरीवाल आणि रेप
व्यंगचित्र श्रेयस नवरे यांचे असून नेटवरून घेतले आहे.
अरविंद केजरीवालांनी आधी आण्णांच्या आंदोलनात पुढाकार घेऊन नंतर आण्णांचा बळी देऊन बरोबर दिल्लीतली सत्ता मिळवली. आता केजरीवालांना वाटतंय ' दिल्ली ( लोकसभा ) दूर नही .' आम आदमीला ( तुम्हाला - आम्हाला ) दिल्ली मुंबई पेक्षाही लहान आहे हे माहित नसेल. पण केजरीवालांना तरी माहिती असायला हवं ना ? त्यांना माहिती असेलही पण ते मुद्दामहून डोळेझाक करताहेत. मांजर डोळे झाकून दुध पीतं म्हणून तिच्या पाठणीत फुकनी बसायची चुकते काय ? तीच अवस्था केजरीवालांची होणार आहे.

Friday, 25 April 2014
Politics : मोदी आणि मेस्सी
बार्सिलोनाचा जिगरबाज फुटबालपटु लिओनेल मेस्सी. त्याचा एक वॉल पेपर आमच्या चिरंजीवांच्या मोबाईल स्क्रीनवर आहे. माणसांचे फोटो हे माणसांसारखेच असणार त्यामुळेच त्या फोटोचं मला काही विशेष वाटलं नाही. पणत्यावर मेस्सीचा एक उद्गार आहे. म्हणतो, " play for the name on front of the shirt and they will remember the name on the back."
अर्थात " तुम्ही तुमच्या जर्सीच्या दर्शनी भागावर असणाऱ्या नावासाठी खेळा , क्रीडारसिक, तुमचे चहाते आपोआपच त्या जर्सीच्या पार्श्व भागावरील ( तुमचं ) नाव लक्षात ठेवतील."
सचिन तेंडूलकर हाही असाच जिगरबाजखेळाडू. पण फार थोड्या अगदी बोटावर मोजता येण्याएवढ्या खेळाडूंकडेच एवढ देशप्रेम असतं. बाकी सगळ्यांनाच थोडीशी प्रसिद्धी मिळाली कि पैसा हवा असतो. म्हणूनच क्रिकेटमध्ये फिक्सिंगचा शिरकाव झाला. खेळाडूंकडेच प्रत्येक नव्हे तर प्रत्येक नागरिकाकडे एवढी देश निष्ठा असली असती तर कोणताही देश किती प्रगती करू शकला असता याचा नुसता अंदाजच केलेला बरा.
हे सगळं लिहिण्याचं कारण असं की परवा मोदींचाही असाच एक उद्गार माझ्या पहाण्यात आणि वाचण्यात आला, " तो असा -
Tuesday, 22 April 2014
Politics : काँग्रेस जातीयवादी नाही काय ?
भाजपा
आणि शिवसेना या पक्षांना जातीयवादी ठरवण्यात आणि मतदारांसमोर तसा चित्रं
उभं करण्यातच कॉंग्रेसच्या तमाम नेत्यांनी नेहमीच धन्यता मानली आहे. पण
भाजपा आणि शिवसेना या पक्षांना जातीयवादी ठरवणारी काँग्रेस स्वतः खरंच
निधर्मी आहे का ?
Thursday, 17 April 2014
Love Poem : तुझे डोळे
" डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका "
हे भावगीत सगळ्यांच्या चांगलंच परिचयाचं आहे. तिला आपलं असं रोखून पाहणं फारसं आवडत नसलं तरी आपल्याला मात्रं तिचे डोळे खूप खूप हवे असतात. भले तिनं रोखून पाहिलं तरी. तरी ती डोळा भेट आपल्याला हवी असते.
कारण तिच्या डोळ्यात प्रेम असतं......... आपुलकी असते........... जिव्हाळा असतो......... माया असते.............ममता असते...........श्रद्धा असते..........आणि या साऱ्याहून महत्वाचं म्हणजे आपल्या जगण्याची उमेद तिच्या डोळ्यात असते. तिच्या डोळ्यात असतं आपलं आभाळ.
Wednesday, 16 April 2014
Story For Kid's : Honesty of Rama
Rama lost his parents when he was very young. So he was leaving with his grandmother. His grandmother have no source of earning. She just few money by working at someones home. But she was not getting work every day. So what the money she get found short for bread and butter of both. In short his grandmother was very poor and and so Rama was looking for some work to shear hands of his grandmother.
Friday, 11 April 2014
Story for Kid's : The Milkmaid and her Day-Dream
It is the story of the time of Lord Krishna. There was many milkmaids in the Mathura. The name of the one milkmaid is Tara. She was poor but willing to be a rich. She always dreaming lot. She was very hardworking. She woke up in the morning. She went to the market with a pail of milk on her head and sold it there.
Wednesday, 9 April 2014
Love Poem : तुझे नाव माझ्या मनी
दोन ध्रुव विषुवृत्तावर आणून ठेवल्यासारख त्याचं आयुष्य. एकरूप, एकजीव.
त्याला तिच्या चेहऱ्यावरच इवलसं हसू हवसं असतं. आणि तिला त्याची
साताजन्माच्या ओढीची मिठी.
पण कधीतरी अशी वेळ येते. तिला नको असतानाही त्याच्यापासून दूर घेवून जाते. माहेराच्या कुशीत. काही दिवस तिला बरंही वाटतं. डोंगरापल्याडचं तिचं गाव. त्या गावातली गर्द हिरवाई. आईची कुस, मायेचा गोतावळा. आणि सोबतीला त्याच्या आठवणी.
पण काही दिवसातच या आठवणींचा तिला उबग येतो. त्याचीच साथ……… त्याचीच सोबत ………. त्याचाच सहवास हवा वाटतो. अवती भवती सगळीकडे.

Story For Kid's : Labours and Cock
Story For Kids : Young Moustache and Old Hair.
Each and every person looking to be young. Nobody likes wrinkles on their face and skin. Raghu is is older person. But his thinking is as same as others. One he was invited to a party.
He was a good looking person. His face was still free of wrinkles. He shaved everyday so he have no bread. But his moustache and hair on his head tuning to white. White shade of his hair showed his age. So he decided to dye them black.

Tuesday, 8 April 2014
Love Poem : आला आला सखा माझा
गेली सहा सात दिवस गावी गेलो होतो. शेतावर. कालच आलो. माझं गाव तसं छोटेखानी. काँग्रेसच्या जवळजवळ साठ वर्षाच्या राजवटीनं शेतकऱ्याला पिण्यासाठी आणि शेतीसाठी पुरेसं पाणी पुरवलं नसलं………शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव दिला नसला………. शेतकऱ्याला आत्महत्येच्या खाईत लोटलं असलं तरी गावागावात कॉम्पुटर आणि घराघरात मोबाईल मात्र नक्की पोहचवलाय. गावतल्या सायबर कॅफेत मुलं MSCIT शिकत असतात. या शासनमान्य कोर्सानं मुलांना काय दिलं ? माहित नाही पण गल्ली बोळात सुरु झालेल्या सायबरवाल्यांनी मात्रं धंदाच केला.
तर सांगायचा मुद्दा हा कि माझं गाव छोटेखानी असलं तरी तिथं सायबर कॅफे आहे आणि गावी गेल्यावर कधीकधी मी तिथल्या सायबर कॅफेतून पोस्ट करतो. पण यावेळी गावातल्या दोन्ही सायबर कॅफेतलं नेट बंद होतं आणि म्हणून मला नवं लिहायला वेळ झाला. हे मात्रं ' नमनालाच तेल फार ' झालं. तेव्हा थांबतो -
तर ती दूर रानात ………. त्याची वाट पाहत. आज कधी नव्हे ते त्याला उशीर झालेला ………त्याची वाट पाहून तिच्या डोळ्यात पाऊस आलेला.
ती अगदीच कासावीस ………त्याची वाट पाहवून …….निशब्द झालेली.
त्याचं वाट पाहणं जसं नेहमीचंच ………….तसाच तिचा उशीरही.

Tuesday, 1 April 2014
Women footwear : बाईची चप्पल
प्रसंगच तसा होता. तसं
पाहिलं तर सहज विसरून जावा असा पण माझ्या मनात त्या प्रसंगाने वादळ उठवळ.
झालं काय -
बऱ्याच वेळा ऑफिसला जाताना माझ्यावर जीप, ट्रक यासारख्या खाजगी वाहनान ऑफिसला जाण्याची वेळ येते. काही चेहरे अधून- मधून दिसत असतात. तोंड देखले का असेना पण ओळखीचे वाटतात. कधी कधी चार - दोन शब्दांची देवाण घेवाण झालेली असते. कधी नजरानजर होताना ओठांच्या कोपऱ्यात हळुवार हसू फुलेल असत. डोळ्यांना डोळे भेटतात तेव्हा कधी कधी ओळखीचं आश्वासन दिसून येतं. अशाच एका मला माझ्या थांब्यावर भेटणाऱ्या " बाईचा " हा किस्सा. बाईचा किस्सा म्हणलं कि आता सगळेच जरा सावरून बसतील. ते सहाजिकच आहे. आणि सावरून बसायलाच हवं कारण किस्साही तसाच आहे.

Subscribe to:
Posts (Atom)